सकल माळी समाज, सामाजिक व राजकीय संघटनेकडुन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध !....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर

 राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील ह्या महामानवांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल चद्रकांत पाटील यांचा धरणगाव शहरातील समस्त माळी समाज पंचपंडळ, शिवसेना (उबाठा) परिवार, संत सावता माळी युवक संघटना, महात्मा फुले युवा क्रांति मंच, महात्मा फुले ब्रिगेड, सत्यशोधक समाज संघ व आदी संघटनेकडुन मा.तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. [ads id="ads1"]  

           यावेळी मोठा माळीवाडा समाजाध्यक्ष विठोबा महाजन, लहान माळीवाडा अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निंबाजी महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, राजेंद्र महाजन, सहसचिव डिगंबर माळी, माजी सचिव दशरथ महाजन, सुकदेव महाजन, माजी मुख्याध्यापक एस.डब्लु.पाटील, महाराष्ट्र ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आबासाहेब वाघ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड.शरद माळी,  [ads id="ads2"]  

युवा क्रांती मंचचे अध्यक्ष आर.डी.महाजन, सत्यशोधक संघटनेचे पी.डी.पाटील, संत सावता माळी युवक संघटनेचे विनायक महाजन, अमोल महाजन, महात्मा फुले ब्रिग्रेडचे राजु महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, गोपाळ वऱ्हाडे, धिरेंद्र पुरभे, गोपाळ महाजन, सुनील चव्हाण, राजु चौधरी, राजेंद्र मराठे, भरत महाजन, राहुल रोकडे,परमेश्वर महाजन, मनोज पटुने, रविंद्र बाविस्कर, गणेश महाजन आदी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!