रावेर तालुका प्रतिनिधी (राजेश वसंत रायमळे)
ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेची जिल्हा बैठक रविवार दि.४ डिसेंबर रोजी खड्डा जीन अमळनेर येथे संपन्न झाली.बैठकीत ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या रावेर तालुका अध्यक्ष पदी विजय पाटील यांची फेर नियुक्ती जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी केली. [ads id="ads1"]
ही बैठक महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (जळगाव), यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.[ads id="ads2"]
यांची होती उपस्थिती
बैठकीला ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या जिल्हा सचिव Adv. जास्वंदी भंडारी (भुसावळ),जिल्हा पदाधिकारी अशोक महाजन (रावेर),कैलास महाजन (एरंडोल),प्रा.डॉ.सुभाष किसन महाजन (अमळनेर),Adv.कुंदन साळुंके (अमळनेर),स्रीरोग तज्ञ डॉ.विनोद कोतकर (चाळीसगाव),जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ.मेधा भांडारकर (अमळनेर), ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे तालुकाध्यक्ष प्राचार्य डॉ.रविंद्र माळी (अमळनेर),रोहित मगर (जळगाव), संजय झोपे (यावल),योगेश महाजन (चोपडा),योगेश भोकरे (चाळीसगाव), कैलास कोळी (मुक्ताईंनगर), गोपीचंद सुरवाडे (बोदवड) , भूषण रतन महाजन (जळगाव) ,राजधर महाजन,नितीन ठक्कर,नितीन पाटील, पंकज महाजन (एरंडोल),
सूत्र संचालन प्राचार्य डॉ.रविंद्र माळी यांनी केले.तर आभार प्रा.डॉ.सुभाष महाजन यांनी मानले.
विजय पाटील यांच्या स्तुत्य निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जातआहे.


