रावेर तालुक्यातील अटवाडे (Atwade Taluka Raver) गावच्या सर्व जागा बिनविरोध झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दहा जागेसाठी फक्त दहाच उमेदवारी अर्ज आले आहेत. माजी सरपंच गणेश महाजन व जयेश कुयटे यांच्या प्रयत्नामुळे सरपंच पद व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत.[ads id="ads2"]
अटवाडे (Atwade Taluka Raver) येथील माजी सरपंच गणेश महाजन यांच्या अथक प्रयत्नामुळे अटवाडे ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा बहुमान मिळाला आहे. सर्वसमावेशक उमेदवारांना येथे संधी दिल्याने तसेच ग्रामस्थ एकमताने पाठीशी उभे राहिले म्हणून ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे माजी सरपंच गणेश महाजन यांनी सांगितले.
हेही बातमी वाचा: रावेर तालुक्यातील कोचूरच्या तरुणाच्या खून प्रकरणी दोघही संशयीतांची निर्दोष मुक्तता
👉हेही व्हिडिओ बातमी पहा : रावेर शौचालय घोटाल्यातील आरोपींनी जमा केले 10 लाख रुपये, तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांची माहिती
👉हेही व्हिडिओ बातमी पहा : केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास १० डिसेंबरला रावेर येथे राष्ट्रवादीतर्फे रास्तारोको आंदोलन निवेदनाद्वारे दिला ईशारा
अटवाडे ग्रामपंचायत (Atwade Grampanchayat) मध्ये यांना मिळाली कारभार करण्याची संधी लोकनियुक्त सरपंचपदी ममता किरण कोळी तर ग्रामपंचायत सदस्य पदी आर के पाटील ,नितीन आत्माराम धनगर, योगेश संतोष महाजन, पूनम मोहन कोळी, रेखा किशोर महाजन ,कल्पना भगवान धनगर, कविता जनार्दन महाजन, वर्षा विलास पाटील ,गोकुळ भाऊराव करवले ,यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने येथील सर्व जागा बिनविरोध झाले आहेत.


