महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा व बहुजन समाज पक्षा तर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व यांच्यावर कार्यवाही ची निवेदनाद्वारे मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



रावेर तहसीलदार यांना सादर केले निवेदन 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र जनक्रांति मोर्चा व बहुजन समाज पक्षातर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा रावेर येथील तहसीलदार यांच्या कडे निवेदन सादर करून निषेध नोंदविला तसेच महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांची व लोक संघर्षाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांवर आज दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी जळगाव येथे रास्ता रोको दरम्यान अटक करण्यात आली त्या अटकेचा निषेध करण्यात आला व विविध मागण्यांचे सुद्धा न निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"] 

निवेदनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या.

1) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदमुक्त करण्यात यावे.

2) शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्र सरकारने मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा व त्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी. 

3) पुणे येथील शाइफेक प्रकरणातील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मनोज भास्कर घरबड़े, धनंजय भाऊ साहेब, विजय धर्मा ओव्हाळ यांच्यावर दाखल असलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे.

4) शाइफेक झाली त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचेवर झालेले निलंबन तात्काळ रद्द करावे.[ads id="ads2"] 

5) आज जळगाव येथे लोकशाही व सनदशीर मार्गाने रास्तारोको करीत असताना महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे व लोक संघर्षमोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे व त्याच्या सहकारी कार्यकर्त्यांची अटक केली आहे तरी त्यांची तात्काळ सुटका करावी अशा आशयचे निवेदन रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे यांचेकडे देण्यात आले. सदर निवेदनावर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वानखेड़े,बहुजन समाज पक्ष संघटन मंत्री ईश्वर जाधव, जनक्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष श्रीराम कोळी, राजू वानखेड़े, नरेंद्र वानखेड़े, शहर अध्यक्ष महेंद्र जाधव यांच्यासह आदीं जणांच्या सह्या आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!