रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषा बाबत अपशब्द वापरल्याने त्याचा निषेध म्हणुन पिंपरी चिंचवड येथे आंबेडकरी चळवळीचे कार्याकर्त्यानी मंत्री चंद्रकांत पाटील यांच अंगावर शाई फेकून निषेध नोंदविला असता सदर कार्यकत्या विरोधात पोलीस प्रशासनाने भा.द.वि.क. ३०७,३५३,१२०(ब) व २९४ प्रमाणे खोटया स्वरुपाचे गुन्हे दाखल केले.[ads id="ads1"]
मंत्री चंद्रकात पाटील यांचे वक्तव्याचा व पिंपरी चिंचवड पोलीसांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर केलेल्या खोट्या गुन्हयाचे निषेधार्थ म्हणुन आज दिनांक 13 डिसेंबर रोजी जळगाव शहरा मध्ये आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मा. मुकुंदभाऊ सपकाळे यांनी रास्तारोको आंदोलन करणार होते.[ads id="ads2"]
परंतु त्या अगोदरच जळगाव पोलीसांनी त्यांना व त्यांचे कार्यकत्यांना स्थानबध्द करुन अटक केली. जळगाव पोलीसाचे सदरचे कृत्य हे लोकशाहीची विटंबना करणारे आहे.आज दि 13/12/2022 रोजी रावेर येथील तहसील ला निवेदन देवून सदर घटनेचा तिव्र शब्दात निषेध नोंदवला.
निवेदन देते वेळी राजु भाऊ सवर्णे,पंकज वाघ,महेश रामचंद्र तायडे,उमेश गाढे,सिद्धार्थ तायडे सर, ॲड. योगेश गजरे,रफिक बेग,यांच्या आदी जन उपस्थित होते.



