राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेरच्या अश्विनी चौधरीने जिंकले गोल्ड मेडल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथील के.एस.ए. गर्ल्स हायस्कुल व सरदार जी.जी.स्पोर्ट्स क्लब येथील विद्यार्थिनी अश्विनी चौधरी हिने शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत राज्यस्तरावर झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकविले. [ads id="ads1"] 

   या बाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर येथील सौ.के.एस.ए.गर्ल्स हायस्कुल ची विद्यार्थिनी असलेली अश्विनी चौधरी हिने 17 वर्ष वयोगटात सिंधुदुर्ग (Sindhudurg)येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत(State Level Weights lifting Compition) गोल्ड मेडल पटकावून संपूर्ण राज्यात आपल्या शहराचे नाव उंचावले आहे. [ads id="ads2"] 

  या स्पर्धेत एकूण 3 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. यात रोशनी महाजन या विद्यार्थिनी ला चौथ्या क्रमांकावर समाधान मनावे लागले तर साक्षी हिला सहाव्या क्रमांकापर्यंत पोहचता आले.

यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक योगेश महाजन तर युवराज माळी, अजय महाजन जे. के पाटील सहकार्य लाभले. केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका जे.एस.पुराणिक मॅडम, उपमुख्याध्यापक जे.एस. कुलकर्णी, पर्यवेक्षक रमण तायडे तर दोघ शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीयांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!