🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 मुंबई करांसाठी मोठी बातमी - मुंबईतील काही भागात उद्या पाणीपुरवठा खंडीत राहणार, तर 4 फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
📣 अभिनेत्री रविना टंडनला भारत सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार म्हणजे आजवरचा सर्वोच्च बहुमान असल्याच्या भावना रवीनाने व्यक्त केल्या.
📣 अदानींच्या कंपनीत IHC कंपनी करणार 40 कोटी डॉलर्सची गुंतवणूक, अदानी एंटरप्राइजमध्ये एफपीओद्वारे गुंतवणूक होणार.
[ads id="ads1"]
📣 पंतप्रधान मोदींचा 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौरा तर 10-12 दिवस आधीच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून पोलीस आयुक्तांकडून तब्बल 4 तास पाहणी करण्यात येणार.
📣 भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, मुरली विजयने 61 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
📣 जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना फरार घोषित करण्यात आले आहे. याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
📣 जगभरातील बड्या कंपन्यांमध्ये नोकर कपात केली जात आहे. यामध्ये आणखी एका कंपनीची भर पडली असून मेडिकल टेक निर्माता कंपनी फिलिप्सने सोमवारी जगभरातील ६००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे.
[ads id="ads2"]
▪️धनुष्यबाण कुणाला मिळणार?: मुदतीत ठाकरे गटाचे उत्तर सादर, शिंदे गटाची अखेरच्या क्षणी धावपळ, थोड्याच वेळात निर्णयाची शक्यता
▪️उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद: पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा 2 फेब्रुवारीला निकाल; मतदानाला संमिश्र प्रतिसाद
▪️ठाकरे - शिंदे गटात कलगीतुरा: मिंधे गटाच्या कागदपत्रांना महत्व नाही - अरविंद सावंत; नरेश म्हस्के म्हणाले - ठाकरे गटाची शपथपत्रे खोटी
▪️शिंदे सरकार 1001 टक्के कोसळणार: खासदार विनायक राऊत यांचा दावा; म्हणाले - शिंदेंना भाजपही नारळ देण्याच्या तयारीत
▪️चंद्रकांत खैरेंच्या मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल: बदलीसाठी पैसे घेतल्याचे कथित संभाषण व्हायरल; ऋषीकेश खैरेंच्या अडचणींत वाढ
▪️संत तुकारामांवरील चिखलफेकीमागे भाजप: काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आरोप; म्हणाले - डोळे उघडा अन्यथा मनुवादाच्या जोखडात अडकाल
▪️LICचा अदानी शेअर्सबाबत मोठा खुलासा: कोट्यवधी पॉलिसीधारकांना सुखद धक्का; म्हणाले- अदानींना दिलेले कर्ज मर्यादेच्या आत
▪️सुरतमधील बलात्कार प्रकरणी आसारामबापू दोषी: 10 वर्षांपूर्वी FIR दाखल, गांधीनगर कोर्ट उद्या शिक्षा सुनावणार
▪️बर्फवृष्टीत राहुल गांधींचे भावुक भाषण: म्हणाले- काश्मिरी लोक आणि सैनिकांप्रमाणे मलाही माझ्या प्रियजनांना गमावण्याचे दु:ख
▪️कर्नाटकात गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला: कॉन्सर्टदरम्यान एका व्यक्तीने बाटली फेकून मारली, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
▪️इलियाना डिक्रूझ रुग्णालयात दाखल: अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिले हेल्थ अपडेट, म्हणाली- मला योग्य आणि चांगली वैद्यकीय सेवा मिळाली
▪️'आर्या 3'चे चित्रीकरण सुरू: सुष्मिताच्या हातात पिस्तुल-सिगार, चाहते म्हणाले – नवीन सीझनसाठी खूप प्रतिक्षा केली