विवरे खुर्द येथे ग्रामसभा अनेक विषायाने गाजली : रेशन दुकाना विरोधात माहिलांचा आक्रोशमोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


विवरे ता.रावेर (संजय मानकरे)

रावेर तालुव्यातील विवरे खुर्द येथील २६ जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती . ही सभा गावातीलअनेक विषाया वरील गाजली सभा सुरु असताना विवरे खुर्द येथील स्वस्त धान्य दुकान असुन सदरील ग्रामसभेत ठहरावा करून दुकान बंद करावी , सदरही दुकानाच्या विरोधात वारंवार तक्रारी झाल्या आहेत.  [ads id="ads1"]  

  कारण रेशन घेणाऱ्या लाभार्थीला वेळेवर धान्य मिळत नाही . नेहमी नेट बंद वस्थेत राहाते . पावती मिळत नाही . अशा अनेक तक्रारी ग्रामस्थांनी रावेर तहसीलदार यांच्या कडे केली असुन अघाप काही कारवाई झालेली नाही . तरी ही दुकान बंद का होत नाही ? कोणाच्या पाटबळ आहे .? वरिष्ठ अधिकारी चौकशी करून या दुकानावर कारवाई का करीत नाही? यासाठी विवरे येथील भर ग्रामसभेत महिलांनी महा अक्रोश मोर्चा काढून ग्रामपंचायतीवर धडकवला होता. [ads id="ads2"]  

 तसेच ग्रामस्थांनी अडी अडचणी या सभेत सांगीतले . याप्रंसगी ससंपच सौ . स्वराताई पाटील. उपससंच बाबुराव पाटील . ग्रामविकास अधिकारी अतुल पाटील . सदस्य सुभाष पाटील . सुनिल पाटील . संदीप पाटील . नसीमा बी शेख शरिफ . माधुरी पाटील . तलाठी रेखा मॅडम . कृषी सहय्याक सरोदे मॅडम व ग्रामस्थां मोठ्या संख्याने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!