🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर प्रथमच महिला अधिकारी नियुक्त: कॅप्टन शिवा चौहान 15632 फूट उंच कुमार पोस्टवर तैनात
▪️अमित शहा जानेवारीत 11 राज्यांचा करणार दौरा: भाजपचा मिशन-2024 वर फोकस, सुरुवात ईशान्येपासून
▪️संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं वावगं नाही: अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रीया, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
[ads id="ads1"]
▪️वंचित - शिवसेना युतीत अडथळ्यांची मालिका: राष्ट्रवादीचा थेट, तर काॅंग्रेसचा छुपा विरोध - प्रकाश आंबेडकरांनीच केले स्पष्ट
▪️PM मोदी यांनी राणे यांना घेतले फैलावर: 'पीए'च्या उठाठेवीमुळे मंत्रिपद काढण्याचा इशारा; खासदार राऊतांकडून पोलखोल
▪️नंगट मानसिकता का म्हणू नये?: चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारे यांना सवाल; सावित्रीमाईंना स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या लेकी अभिप्रेत होत्या का?
▪️भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन: राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी केला होता ॲम्बुलन्सने पुण्याहून मुंबईला प्रवास
[ads id="ads2"]
▪️टीम इंडियाने वर्षातील पहिला T20 जिंकला: श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव, पदार्पणात शिवम् मावीने घेतले 4 बळी, उमराननेही 2 गडी टिपले
▪️BCCI कडून विश्वचषकासाठी यादी तयार: शाॅर्टलिस्ट 20 खेळाडूंची 35 सामन्यांतून परीक्षा, ऑक्टाेबरमध्ये भारतात हाेणार वनडे वर्ल्डकप
▪️बंगाली गायिका सुमित्रा सेन काळाच्या पडद्याआड: वयाच्या 89 व्या वर्षी निधन, CM ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक
📣 राज्यात पुढच्या दोन ते तीन दिवसांत काही भागात थंडीची लाट येणार आहे - अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे
📣 नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उदघाटन करण्यात आले
📣 सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्समधून पुनरागमन करणार, आयपीएल 2023 साठी सौरव गांगुलीची टीमच्या संचालकपदी निवड होणार
📣 'ब्लॅक पँथर वकांडा फॉरेव्हर' आणि अवतार हे दोन चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित होणार, अवतार हा चित्रपट एप्रिल 2023 तर ब्लॅक पँथर हा 1 फेब्रुवारीला सर्व भाषेत रिलीज होणार आहे
📣 मराठी भाषेची गोडी वाढवावी, मराठी संस्कृतीला उजाळा द्यावा यासाठी मुंबईत पुढील तीन दिवस विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आल आहे
📣 महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहे, खाजगीकरणा विरोधात कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


