याबाबत सविस्तर माहिती अशी की दर महिन्याला जळगाव येथून रेशन धान्य वाहतूक ही ट्रक द्वारे प्रत्येक तालुक्यात होत असते जळगाव येथून रेशन धान्य तालुक्याच्या ठिकाणी वाहतूक करताना रेशन धान्याचे टोकन ज्या ठिकाणी पाठवायचे आहे त्या ठिकाणचे टोकन संबंधित ट्रक चालकास दिले जाते. [ads id="ads2"]
टोकन घेऊन रेशन धान्य वाहतूक करणारा ट्रक ज्या ठिकाणचे टोकन आहे त्या गोडाऊन मध्येच किंवा रेशन धान्य दुकानदाराकडेच जाते का? याची प्रत्यक्ष खात्री संबंधित गोदामपाल आणि पुरवठा अधिकारी करीत आहेत का? प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धान्य गोडाऊन मध्ये किंवा संबंधित रेशन दुकानदाराने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत का? रेशन दुकानात दर महिन्याला मंजूर झालेले रेशन धान्य प्रत्यक्ष स्टॉक रजिस्टरला नोंद झाले असता पुरवठा अधिकारी खात्री करतात का?
हेही वाचा : मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
स्टॉक रजिस्टर प्रमाणे ते रेशन धान्य कागदोपत्री लाभार्थ्यांच्या नावावर विक्री दाखवून विक्री दाखवताना अनेक ग्राहकांना कमी प्रमाणात धान्य देऊन ( कागदोपत्री नियमानुसार धान्य दिल्याचे दाखवून) दुकानात धान्य साठा करून वेळेनुसार तो धान्य साठा काळ्या बाजारात नियोजनबद्ध रीतीने रवाना करण्यात येत असल्याने तसेच यात संबंधित सर्व यंत्रणेचे संगनमत असल्याने काळ्या बाजारात जाणारे रेशन धान्य वाहतूक ही आज तरी कोणीही थांबू शकत नाही असे सुद्धा रेशन धान्य ग्राहकांमध्ये बोलले जात आहे.


