रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने रावेर येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यात येत आहेत. हा सप्ताह आठवडाभर चालणार आहेत त्या निमित्ताने तालुक्यातील दोन ते तीन शाळांच्या विद्यार्थ्यांना दररोज पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना कायद्याचे असो वा इतर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. [ads id="ads1"]
दि.३ रोजी रेझींग डे च्या निमित्ताने पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक कैलास नागरे पीएसआय दिपाली पाटील यांनी येथील सरस्वती विद्या मंदिर च्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
हेही वाचा :- महामंडळ परवानाधारक टी स्टॉल दुकानदाराकडून मुलींची छेडखानी ; दुकानदार पोलिसांच्या ताब्यात :यावल एसटीस्टँड आवारात बघ्यांची मोठी गर्दी
रेझिंग डेच्या निमित्ताने रावेर पोलीस स्टेशन मध्ये सरस्वती विद्या मंदिर च्या सुमारे २०० विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीसस्टेशन मधील संपूर्ण विभागाची माहिती देण्यात आली. [ads id="ads2"]
तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी कसे राहिले पाहिजे. दैनंदीन कामकाजाची माहीती, मोबाईल, सोशल मिडीया, वाहतुकीचे नियम, विद्यार्थी विद्याथीनिनी घ्यावयाची काळजी, वाईट प्रवृत्ती पासून दूर राहणे, तसेच 'विद्यार्थी विद्यार्थिनींना काही अपरिचित घडत असताना पोलिसांची घाबरू नका ते आपले मित्रच आहेत कोणतीही तक्रार केली तरी तक्रारदाराचे नाव समोर येणार त नाहीत माझ्याशी संपर्क साधा मुलींनी पी एस आय दिपाली पाटील यांच्याशी संपर्क साधा पोलिसांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही स ते आपल्यातलेच एक आहेत तक्रार करण्यास म किंवा पोलिसांना माहिती देण्यास घाबरू नका. असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री नागरे यांनी ज विद्यार्थ्यांना केले. दिलीप जाधव, मोहन बारी, ललीता राणे, अनिता गाढे, गोपनिय विभागाचे उप करोडपती, पुरुषोत्तम पाटील, सचिन घुगे उपस्थित होते


