दिनांक 5 जानेवारी 2023 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️ बिल्कीस बानो प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारीपर्यंत टळली: SCच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदींनी दुसऱ्यांदा माघार घेतली, दुसरे बेंच करणारा सुनावणी


▪️ वीज कंपन्यांचे खासगीकरण नाहीच: देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे


▪️ अनिल परब यांना EDचा धक्का: 10.20 कोटींची मालमत्ता जप्त, रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन, साई रिसाॅर्टचा समावेश


▪️ 'शिवशक्ती-भीमशक्ती'ची घोषणा: राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला; जोगेंद्र कवाडे, म्हणाले - एकमताने युतीचा निर्णय

 [ads id="ads1"]  

▪️ अजित पवार एकीकडे भूमिकेवर ठाम: म्हणाले - छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच; दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत


▪️ धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात: परळीजवळ झालेल्या दुर्घटनेत छातीला 2 फ्रॅक्चर; मुंडे म्हणतात - काळजी करण्यासारखे नाही!


▪️ ऋषभ पंतच्या गुडघ्याचे होणार ऑपरेशन: पंतला एअरलिफ्ट करून मुंबईत आणणार, कोकिलाबेन रुग्णालयात केले जाणार उपचार


▪️ सौरव गांगुली IPL मध्ये आपल्या जुन्या संघात परतला: पूर्वीपेक्षा मोठी जबाबदारी, फ्रँचायझीच्या सर्व संघांसाठी काम करणार


▪️ दिसतं तसं नसतं... 'वाळवी'चा रहस्यमय ट्रेलर रिलीज: मराठीतील पहिला थ्रिलकॉम चित्रपट, दमदार कलाकारांची फौज

 [ads id="ads2"]  

▪️ 10 जानेवारीला येणार 'पठाण'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर: निर्मात्यांनी बनवली खास स्ट्रॅटेजी, चित्रपटाच्या शीर्षकात कोणताही बदल होणार नाही


📣 एनसीपीआयने दिलेल्या माहितीनुसार UPI च्या ग्राहकांना आता दिवसाला केवळ १ लाखांच पेमेंटच करता येणार आहे.


📣 FMCG प्रमुख डाबर इंडिया कंपनीने बादशाह मसाला या मसाल्यांच्या कंपनीत ५१ टक्के शेअर्स ५८७.५२ कोटीत विकत घेतले आहे त्यामुळे बादशाह मसाला ची मालकी आता डाबरकडे गेली. 


📣 राज्यातील पाचवीसह आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे त्यानुसार या परीक्षेत पाचवीचे २३.९० आणि आठवीचे १२.५३ विध्यार्थी पात्र ठरले. 


📣 अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. 


📣 जगातील पहिले फार्म ऑफ फ्युचर केंद्र बारामती येथे सुरू करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ.रणवीर चंद्रा यांनी केली.


📣 केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील दौसा येथे पूर्णपणे इलेक्ट्रिक महामार्ग बनवण्याची घोषणा केली आहे. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!