दिनांक 7 जानेवारी 2023 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️ समलैंगिक विवाहावरील सर्व याचिका सुप्रीम कोर्टात वर्ग: मार्चपर्यंत याचिकांचे लिस्टिंग; केंद्राला 15 फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश


▪️ अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी: कुख्यात 'अल कायदा'ची मंदिराच्या ठिकाणी पुन्हा बाबरी मशिद बांधण्याची दर्पोक्ती


▪️ सुनील शेट्टींची थेट योगी आदित्यनाथांकडे मागणी: बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड बंद करा, इंडस्ट्रीत सगळेच ड्रग्ज घेत नाहीत

 [ads id="ads1"]  

▪️ संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट: मेधा सोम्मयांच्या मानहानी प्रकरणी कोर्टाचे आदेश; 24 जानेवारीला पुढील सुनावणी


▪️ उर्फी वादावर महिला आयोगाचे स्पष्टीकरण: चित्रा वाघ यांना नोटीस, चाकणकर म्हणाल्या- कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा अधिकार


▪️ अमोल मिटकरींची राज्यपालांवर टीका: शिवप्रतिमा हातात असताना कोश्यारींसह CM योगींनी पादत्राणे घातलेला फोटो केला पोस्ट


▪️ मोदी सरकारने मालकधार्जिणे कायदे आणले: उद्योगपती मित्रांना 10.50 लाख कोटींची कर्जमाफी, कामगारांचे हक्क संपुष्टात आलेय - नाना पटोले


▪️ नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का: संजय राऊतांच्या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठे खिंडार!, 50 पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

 [ads id="ads2"]  

▪️ व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन वर्षाचे गिफ्ट: आता इंटरनेटशिवाय करता येणार चॅटिंग, जगभरातील युजर्ससाठी सुरू केला प्रॉक्सी सपोर्ट


▪️ रोहित-विराट न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 मालिकेत खेळणार नाहीत: BCCI च्या अधिकाऱ्याची माहिती-दोघांचाही विचार नाही


▪️ प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शक सुनील बाबू यांचे निधन: हार्ट अटॅकने 


📣 व्हॉट्सअपने जगभरातील युजर्ससाठी proxy support फिचर्स लाँच केले आहे - यामुळे युजर्सना इंटरनेट नसले तरी व्हॉट्सअप वापरता येणार आहे 


📣 फायझर कंपंनीची मोठी घोषणा - एखादा कर्मचारी वडील झाल्यानंतर त्याला १२ आठवड्यांची सुट्टी देण्यात येईल 


📣 देशात गेल्या 24 तासांत 228 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली यामध्ये सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 2,503 पर्यंत गेली आहे - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहीती


📣 प्राण्यांना होणाऱ्या लम्पी त्वचा रोगावर प्रतिबंधक लशीचे उत्पादन पुण्यात होणार आहे - असे सरकारने म्हटले आहे 


📣 भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. 


📣 कोविडनंतर पुन्हा विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेसाठी बुकिंग सुरु, विठुरायाच्या पूजेसाठी 25 हजार तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11 हजार रुपये शुल्क मोजावे लागतील. 


📣 *SBI च्या 5212 ज्युनिअर असोशिएट लिपिक आणि कस्टमर सपोर्ट & सेल्स भरतीचा निकाल जाहीर - bit.ly/3GJ7DXi*


📣 पश्चिम बंगालच्या मुलांना शाळेत मिड-डे मीलमध्ये आठवड्याला मिळणार चिकन व हंगामी फळे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा तर 371 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!