ढाब्यावर काम करणाऱ्या तरुणाने झाडाला गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर पोलीस स्टेशन (Raver Police Station) अंतर्गत येणाऱ्या पाल गावातील आऊट पोस्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेला तरुण हा रावेर तालुक्यातील पाल (Pal Taluka Raver) येथील "डोंगर जय पॅलेस" या ढाब्यावर मजूर म्हणून काम करत होता त्याच्या कुटुंबात आई आणि वडील आहेत आणि सूरज नावाचा त्याचा मेहुणा देखील "डोंगर जय पॅलेस" (Dongar Jay Palace) या ढाब्यावर काम करतो. [ads id="ads1"]  

सविस्तर वृत्त असे की, बुरहानपूर जिल्ह्यातील धुळकोटबोरी (Dhukotbori District Burhanpur) गावातील रहिवासी 19 वर्षीय तरुण मुकेश सुकलाल सोलंकी याने शुक्रवारी दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पालगाव पोलीस स्टेशन हड्डीच्या शेरीनाका परिसरात झाडाला गळफास लावून घेतला. मात्र त्याचा मृतदेह लटकलेला पाहिल्यावर गावातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पाल (Pal Taluka Raver) पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. विशाल सोनवणे हे त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल ठाकूर,उमेश नरवाडे, आमोदकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. [ads id="ads2"]  

पोलिसांनी फास कापून मृतदेह खाली उतरवून सदर घटनेचं पंचनामा केला. मुकेश हा या धाब्यावर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता, सुमारे महिनाभरापूर्वी तो पाल गावातील "डोंगर जय पॅलेस" ढाब्यावर रात्री काम करायचा. 

हेही वाचा: दुःखद बातमी : दुचाकीच्याह अपघातात रावेर तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू ; तर दुसरा गंभीर जखमी 

हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" गावातील विवाहितेचा विनयभंग : एक जणांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल 

पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रावेर ग्रामीण रुग्णालय रावेर (रावेर Rural Hospital) येथे आणले. परिस्थिती पाहता ते त्याने आत्महत्येचे पाऊल कसे उचलले असावे याचा अंदाज नाही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!