यावल ( सुरेश पाटील)पाणी साठा मुबलक असताना सुद्धा नियोजन शून्य कारभारामुळे यावल शहरात सकाळी 2 वाजता पाणीपुरवठ्याची वेळ तसेच कचरा व साफसफाई अनियमित होत असल्याची तक्रार यावल शहर युवा सेने तर्फे करण्यात आली. [ads id="ads1"]
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.6 रोजी दिलेल्या निवेदनात यावल शहर युवा सेना प्रमुख सागर देवांग,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शहर उपप्रमुख योगेश राजपूत,सरचिटणीस विजय पंडित,शहर उपप्रमुख संतोष धोबी शिवसैनिक विवेक अडकमोल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल शहरात काही भागात सकाळी (रात्री) 2 वाजता पाणीपुरवठा केला जातो बऱ्याच भागातील नागरिक हे गाढ झोपेत असतात त्यामुळे या नागरिकांना एवढ्या रात्री पाणी भरणे शक्य होत नाही,त्यामुळे सुमारे दोन तास पाणी वाया जाते व पाण्याचा अपव्यय होतो पर्यायाने पाण्याची नासाडी होत आहे,पाणी गटारीत वाहून जात आहे व नंतर पाणी पुरवठा बंद केला जातो किंवा इतर भागात सोडले जात असल्याने या भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. तरी सदरची पाणीपुरवठ्याची वेळ किमान सकाळी चार वाजता नियमित करण्यात यावी. [ads id="ads2"]
तसेच यावल शहरातील मेन रोडवर अशोका साडी सेंटरच्या मागील बाजूस रोज अत्यंत दुर्गंधीयुक्त कचरा टाकला जातो तो नियमित उचलला जात नाही मोकाट गुरे व डुकरे या कचऱ्याला अस्ता-व्यस्त पसरवितात त्यामुळे या भागातून जाणे येणे जिकरीचे झाले आहे व ऐन बाजार पेठेत दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: दुःखद बातमी : दुचाकीच्याह अपघातात रावेर तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू ; तर दुसरा गंभीर जखमी
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" गावातील विवाहितेचा विनयभंग : एक जणांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल
तरी रोज कचरा व साफसफाई करण्यात यावी अन्यथा उद्धव ठाकरे शिवसेना गटातर्फे आंदोलन छेडले जाईल त्याच प्रमाणे कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारास जर प्रत्येक घराप्रमाणे कचरा उचलणे किंवा साफसफाईचा ठेका देण्यात आला आहे तर सदर ठेकेदार प्रत्येक घरापर्यंत का पोहोचत नाही? याची चौकशी करण्यात यावी तसेच यावल शहरातील संपूर्ण साफसफाई स्वच्छता होत नाही तो पर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये असे सुद्धा युवा सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तरी यावल यावल नगरपालिका मुख्याधिकारी काय कारवाई करतात याकडे युवा सेनेचे लक्ष वेधून आहे.



