रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील गहुखेडा (Gahukheda Taluka Raver) येथिल प्रशांत भागवत तायडे वय (३०) वर्ष व जयेश व्दारकानाथ पाटील वय (२३) वर्ष दोघे राहनार गहुखेडा ता. रावेर (Gahukheda Taluka Raver) येथून आपल्या MH 19 CP 2355 नंबरच्या या दुचाकीने शैक्षणिक कामा निमित्त जळगांव येथे विद्यापीठात (KBC NMU JALGAON) गेले असता. आपले काम आटपून परतीने येत असताना राष्ट्रीय महामार्गावर खोटे नगरजवळ (Khote Nagar Jalgaon) वाटीकाश्रमाच्या समोर पाठीमागून येत असलेल्या आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिली असता. [ads id="ads1"]
गाडीवरून दोघे जण रोडावरती फेकले गेले असता समोरून येणाऱ्या खळीने भरलेल्या MH 19 AN 2438 या नंबरच्या ट्रॅक्टरच्या टायर खाली येवून प्रशांत भागवत तायडे याचा जागीच मृत्यू झाला. तर जयेश द्वारकानाथ पाटील हा गंभिररित्या जखमी झाले. [ads id="ads2"]
घटनेची माहिती जळगांव तालुका पोलीस स्टेशनला मिळताच त्या ठिकाणी पोलीस कर्मचार्यांनी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाला शासकीय रुग्णालयात पाठवले व जखमी जयेश पाटील याला खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" गावातील विवाहितेचा विनयभंग : एक जणांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल
मयत प्रशांत तायडे यांच्या पश्चात आई वडिल व एक विवाहीत बहीण असुन प्रशांत हा एकटाच असुन सर्वांचा लाडका होता. गहुखेडा (Gahukheda Taluka Raver) गावामध्ये घटनेची माहिती मिळताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. एक मनमिळावू दोस्तीच्या दुनियेतील राजा मानुस आज आम्हाला सोडून गेला. अशी खंत गावकरी व्यक्त करित आहे.



