फुलेंच्या विचाराने जिवनाचा उद्धार करा : वनक्षेत्रपाल अजय बावने यांचे विवरे येथे प्रतिपादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विवरे बु॥ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कर्तृत्ववान महिलांचा, विद्यार्थीनींचा सत्कार !

युवक- युवतींना पोलीस भरती पुर्व मार्गदर्शन तर विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 

रावेर प्रतिनिधी(समाधान गाढे) 

 शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे.आधुनिक शिक्षणाने जिवनाचा उद्धार करा. असे प्रतिपादन विवरे येथे आयोजित क्रांतीज्योती सावित्री फुले जयंती निमित्त सत्कार समारंभ कार्यक्रमात वनक्षेत्रपाल अजय बावने यांनी प्रतिपादन केले.तालुक्यातील विवरे बु॥ येथे जिरेमाळी समाज सेवा संघ व श्री संत सावता माळी व्यायाम मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिनाचे औचित्य साधून गुणवंत,यशवंत, किर्तीवंत मुलींचा,महिलांचा , शिक्षकांचा,विद्यार्थीनी विद्यार्थ्याचा गुणगौरव सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रल्हाद चौधरी होते. [ads id="ads1"]  

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव नरवाडे यांनी केले. कांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद चौधरी, वनक्षेत्रपाल अजय बावने , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ , सीआरपीएफ उपनिरीक्षक सुभाष नरवाडे , पोलीस उपनिरीक्षक राका पाटील , इंजिनिअर विनायक जिरी, सरपंच इनुस तडवी , उपसरपंच सौ भाग्यश्री पाटील , सौ हर्षा बेंडाळे , सौ ज्योती साकाळ, सौ स्नेहा पाचपांडे , श्रीमती रेखा गाढे , नौशादबी , युसुफ खाटीक , विनोद मोरे या मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महिला भजनी मंडळ ,अगणवाडी सेविका , मदतनिस, आशा वर्कर यासारख्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थीनी , विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य वाटप करून सत्काराने गौरविण्यात आले. जागृती महाजन , आरती चौधरी या मुलींनी स्पर्धा परिक्षांमध्ये यश संपादन करून शासकीय नोकरीत लागल्याबद्दल सत्कार करण्यात आला. [ads id="ads2"]  

        निंभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, वनक्षेत्रपाल अजय बावने (रावेर) उपनिरीक्षक सुभाष नरवाडे यांनी सायबर गुन्हेगारी, सायबर सुरक्षा ,पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण पर मार्गदर्शन केले. तसेच कु.दिक्षा गुप्ता,सौ भारती जिरी, सौ भाग्यश्री पाटील, सौ किर्ती गुप्ता यांनी मनोगत व्यक्त करित शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

        कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरूण महाजन , विवरे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमेश पाचपांडे, ज्ञानदेव पाचपांडे, भागवत सप्ताह समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर सपकाळ गुरुजी , सदाशिव सणंसे, गुरुजी , सगर वंशिय जिरेमाळी समाजाचे संचालक काशिनाथ खुर्दे, महेंद्र नरवाडे , शांताराम टेम्पे , रूपचंद टेम्पे, काशिनाथ सपकाळ , गोवर्धन नरवाडे, विजय पुराणे, चंद्रकांत महाजन, लोहपुरुष मंडळाचे सचिव हितेंद्र राणे ,संत सावता महाराज महिला भजनी मंडळाच्या सौ सरस्वती सपकाळ, सौ शकुंतला नरवाडे, सौ अंजनी हरमकार, विठठल मंदिर भजनी महिला मंडळाच्या श्रीमती जाईबाई भिरुड, सौ गायत्री किशोर महाजन, सौ कविता पुराणे ,सौ मिनाक्षी सपकाळ , मा. उपसरपंच जनार्दन जुनघरे, यांचेसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संत सावता माळी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष वासुदेव नरवाडे , उपाध्यक्ष गणेश सपकाळ, सचिव महेंद्र माळी , कोषाध्यक्ष संतोष जुनघरे ,संचालक प्रशांत नरवाडे , विजय पुराणे ,जनार्दन जुनघरे, भानुदास महाजन , विजय नरवाडे , किशोर महाजन, राहुल पारसकर, प्रसाद नरवाडे, सुरज नरवाडे, पुंडलीक नरवाडे , विकास टेम्पे, ज्ञानदेव सणंसे , हिरामण नरवाडे , चंद्रकांत नरवाडे, संतोष जुनघरे , विजय जुनघरे ,योगेश महाजन पोलीस पाटील, पंकज सपकाळ, दिनेश टेम्पे ,रूपेश सपकाळ, सुनिल चौधरी , किरण चौधरी, आनंदा दहिभाते, पंकज दहिभाते, सौ शकुंतला नरवाडे, माजी सरपंच सौ आशा नरवाडे, सौ लता नरवाडे ,सौ सविता नरवाडे, यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!