रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात बैठक पार पडली. पार पडलेल्या बैठकीत रावेर शहरातील समाज बांधवांच्या उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीची 132 वी डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती,रावेर शहराची समिती स्थापन करण्यात आली. [ads id="ads1"]
सर्वप्रथम सर्व समाज बांधवांकडून त्रिशरण,पंचशील घेण्यात आले. त्यानंतर माजी नगरसेवक ॲड. योगेश गजरे, जे. व्ही.तायडे सर, निळे निशाण चे आनंद भाऊ बाविस्कर,बौद्धांचार्य राजेंद्र अतकाले यांच्या सह आदी मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. त्यानंतर सर्व समाज बांधवांच्या वतीने कार्यकारिणीची निवड एकमताने निवड करण्यात आली. [ads id="ads2"]
सदर बैठकीत राष्ट्रवादीचे पंकज वाघ,सामाजिक कार्यकर्ते धुमा तायडे, सावन मेढे, सचिन तायडे, धनराज घेटे, अमर तायडे, नगीन तायडे, बाळू तायडे, अविनाश लहासे, रुपेश गाढे, सुनील जाधव, प्रकाश अडकमोल, राजाराम मोरे, बाळा बाविस्कर, अमर पारधे, जितू घेटे, शुभम घेटे, रितिक पारधे, सिद्धार्थ शिरतुरे, अशोक वाघ, सोनू तायडे, देवेंद्र सोनवणे, रत्नाकर बनसोडे, विनायक तायडे, उमेश अधांगले, रामू तायडे, बंटी अटकळे, लकी वाघ, गोविंद लहासे, नारायण तायडे, सूर्यभान शिरतुरे, सुवर्ण दिप वृत्त पत्राचे मुख्य संपादक राहूल डी गाढे यांचे सह रावेर शहरातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
132 वी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती,रावेर शहर कार्यकारिणी
- आयु.नरेंद्र उर्फ पिंटू वाघ(अध्यक्ष),
- आयु.गोपाल बाऱ्हे(उपाध्यक्ष),
- आयु.सुनिल शिरतुरे (सचिव)
- आयु.राजाराम मोरे (सह सचिव),
- आयु.संकित तायडे(कोषाध्यक्ष),
- आयु.गोपाल तायडे(कोषाध्यक्ष)
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ ; रावेर पोलिस घटनास्थळी दाखल
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले


