रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ ; रावेर पोलिस घटनास्थळी दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ ; रावेर पोलिस घटनास्थळी दाखल

रावेर ग्रामीण प्रतिनिधि ( दिनेश सैमिरे) रावेर तालुक्यातील शिंदखेडा (Shindkheda Taluka Raver Dist Jalgaon) येथे रहिवासी तुषार विकास पाटील वय २६ हा युवक विकास रामभाऊ पाटील (होमगार्ड )याचा मुलगा हा कुठे बाहेर गेला असेल म्हणून त्याचा गावात व नातेवाईकाकडे सर्वदूर शोधाशोध केला असता कुठेही शोध लागला नाही. [ads id="ads1"]  

नंतर गावाच्या आजु बाजुला शोध घेत असताना शिंदखेडा येथील बस स्टँड जवळील (Bus Stand, Shindkheda) मागील बाजूला असलेल्या अनिल अग्रवाल यांच्या शेतातील बंद पडलेल्या विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला असता याबाबत रावेर पोलीस स्टेशनला (Raver Police Station) मयताच्या वडिलांनी फोन करून माहिती दिली असता घटनास्थळी रावेर पोलीस स्टेशनचे (Raver Police Station) उपनिरीक्षक सचिन नवले व पोलीस कॉन्स्टेबल सतीश सानप दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. [ads id="ads2"]  

  त्यानंतर शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय रावेर (Rural Hospital Raver) येथे मृतदेह पाठविण्यात आला तसेच विकास रामभाऊ पाटील (होमगार्ड )यांच्या फिर्याद दिल्यावरून रावेर पोलीस स्टेशनला  (Raver Police Station)सीआरपीसी कलम 174 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा:- आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुतीची जबाबदारी व नवजात बाळाला व मातेला रुग्णवाहिका सेवा न देणाऱ्या डॉ. विजया झोपे यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा - बहुजन समाज पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य प्रदीप सपकाळे यांची निवेदनाद्वारे मागणी

हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले

 सदर गुन्ह्याचा पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष नवले ,पो . कॉ सतीश सानप हे करीत आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!