भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भुसावळ तालुक्यातील कन्हाळा (Kanhala Taluka Bhusawal) येथील तरुणाचा ट्रॅक्टरवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दिनांक 2 रोजी घडली होती. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात (Bhusawal Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. [ads id="ads1"]
संतोष गोपाळ पवार (वय - 29, कन्हाळा खुर्द) हा तरुण ट्रॅक्टर (MH 19 CU 0073) वरून वीटा भरण्यासाठी चालक अशोक सुपडू मोरे ( (Kanhala Taluka Bhusawal) सोबत 2 जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता निघाला असताना खडका शिवारातील (Khadka Shivar) एमएसईबीजवळ(MSEB) भरधाव वेगातील ट्रॅक्टरवरून संतोष पडल्याने त्याच्या डोक्यास दुखापत होवून तो मरण पावला होता. [ads id="ads2"]
ट्रॅक्टर चालकाकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नव्हाता शिवाय तो हलगर्जीपणाने वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाल्याने ए.एस.आय. श्यामकुमार मोरे यांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात (Bhusawal Taluka Police Station) तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.


