जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दिनांक 27/01/2023 रोजी सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात 3.3 रे. से भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. सदर भूकंपाच्या धक्क्यामुळे भुसावळ तालुक्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नये. व भूकंपाचे धक्के जाणवल्यास पुढील प्रमाणे दक्षता घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे.[ads id="ads1"]
1) जर इमारतीत असाल तर घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
2) लिफ्टचा वापर करू नका दाराजवळ अथवा प्रवेश दाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा.
3) जर तुम्ही रस्त्यावर असाल तर - पटकन मोकळ्या जागेत जा घाई गडबड दंगा करू नका.
4) उंच, जुन्या आणि सलग असणाऱ्या इमारतीपासून भिंती विजेच्या तारांपासून लांब राहा.[ads id="ads2"]
5) भूकंपा दरम्यान जमिनीवर पडा मजबूत टेबलाखाली आसरा घ्या जमीन हलने थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा पार्श्वभागावर घ्या डोके गुडघ्याजवळ घ्या डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या हात माने भोवती घ्या. भूकंपच्या परस्थितीत सहाय्यासाठी स्थानिक प्रशांसनाशी संपर्क साधावा कुठल्याही परिस्थितीत घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान मा. जिल्हाधिकारी जळगांव यांचे द्वारे करण्यात आले आहे.
हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना