सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील विवरे बु येथील लक्ष्मी नगर चे रहिवासी नागरिकांनी ग्रामपंचायत ला गेल्या अनेक महिन्या पासून गटारी चे सांड पाण्याचा निचरा व्हावा पाणी रस्त्यावर येऊन थांबत आहे श्री स्वामी समर्थ केंद्रा च्या पाठी मागे येण्या जाण्या च्या रस्त्यावर सांड पाण्याचा मोठा डोह साचलेला असून त्या पासून लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना साथीच्या आजरांचा सामना करावा लागत आहे व गटारी वरील धापा टाकण्यात यावा धाप्याचे बोगस काम झालेले आहे.अश्या तक्रारी विवरे बुद्रुक येथील लक्ष्मी नगर परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. [ads id="ads2"]
3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती च्या निमित्त सर्व सरपंच व उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये जमलेले असताना सरपंच यांनी लक्ष्मी नगर परिसरात आपण सर्व जाऊन येऊ असे सांगितले असता सर्व ग्रामपंचायत चे पदाअधिकारी लक्ष्मी नगर परीसरांची पाहणी करण्यासाठी आले होते नागरिकांनी सरपंच यांना परिसरातील विकास कमांबद्दल विचारना केली की आमच्या परिसरात गटारी व धापा लवकर करा साहेब असे सांगितले असताना उपसरपंच पती विकास अशोक पाटील यांनी नागरिकांना सांगितले की तुमच्या परिसरात ग्रामपंचायत एक रुपया सुद्धा खर्च करणार नाही तुमच्या ने जे होईल ते तुम्ही करू शकता असा दम देऊन नागरिकांना अरे रावी व घाणेरडे शब्दात वाक्य प्रयोग केला.त्यानंतर नागरिकांनी उपसरपंच पतीला सांगितले की तु निवडून आलेला नाही तुला ग्रामपंचायत च्या कारभारात बोलण्याचा काही अधिकार नाही उपसरपंच पती विकास पाटील यांनी नागरिकांना तुम्हाला ज्याच्या कडे जायचे असेल त्यांचे कडे तुम्ही जा.माझे कोणीही काही ही करू शकत नाही. असा दम दिला असता परिसरात तील नागरिकांनी उपसरपंच पती यांच्या वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व उपसरपंच यांना अपात्र करण्यात यावे. कारण उपसरपंच पती हे नेहमी ग्रामपंचायत च्या कामात हस्तक्षेप करीत असतात व नेहमी ग्रामपंचायत कार्यालयात दप्तरं पाहत असतात व ग्रामपंचायत चे कामे स्वतः दुसऱ्या ठेकेदार च्या नावावर काम किरीत आहे आणि ग्रामपंचायत मध्ये मलाई खाण्याचे काम सरपंच, ग्रामसेवक यांना हाताशी धरू करीत आहे तरी उपसरपंच पती यांच्या वर कायदेशीर कारवाई करून उपसरपंच यांना अपात्र करण्यात यावे उपसरपंच यांना अपात्र न केल्यास व विकास पाटील यांच्या वर कारवाई नकेल्यास पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन शिवसेना रावेर विभाग प्रमुख पिंटू माळी व परिसरातील नागरिकांनी रावेर पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी यांना दिले आहे .
निवेदनावरती सुरेश चौधरी, अंकुश आणेकर, प्रमोद राणे चेतन राणे, अतुल भिरूड, योगेश टेम्पे, कुंदन पाटील, दीपक महाजन, यांच्या सह आदी नागरिकांच्या सह्या आहे



