रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर गाजलेल्या रावेर पंचायत समितीतीलमधील बहुचर्चित असलेल्या शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिसांनी 22 आरोपींकडून सुमारे पन्नास लाख रुपये कारवाईपोटी जमा केल्याची माहिती सदर प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दिली.[ads id="ads2"]
आकडा वाढत जाण्याची वर्तवली जात आहे शक्यता
रावेर पंचायत समितीमधील बहुचर्चित शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर गाजत आहे. आजपर्यंत रावेर पोलिसांनी सुमारे 22 आरोपींकडून पन्नास लाख रुपये जमा केले असुन पुढील काही दिवसात हा आकडा जास्त वाढण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शितळकुमार नाईक यांनी बोलताना दिली. काही दिवसांपूर्वी रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी वकीलासह पोलिस स्टेशनला या शौचालयाच्या गुन्हा संदर्भात भेट दिली होती.


