रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी
नवीन निंबोल गावातील हनुमान मंदिराशेजारी सन 2020 21 मध्ये पुरुषांची आणि स्त्रियां साठी शौचालय बांधकाम करण्यात आले आहे. शौचालय चे बांधकाम स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 15 वा वित्त आयोग (स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. (हागणदारी मुक्त गाव )म्हणून ही योजना शासन प्रत्येक गावी राबवित असते. पण आज रोजी निंबोल गावातील या शौचालयास लगबग 2 वर्षे पूर्ण झालेले आहेत. चालू वर्षे 2023 /24 जानेवारी सुरू आहे तरीसुद्धा शौचालयाचे काम अपूर्ण दिसून येत आहेत. [ads id="ads1"]
पुरुष व स्त्रिया यांच्या शौचालयास दरवाजा नाही तसेच आत मध्ये नळ आहे तर दोन वर्षापासून पाण्याची सुविधा नाही. लोक उघड्यावर शौचालयात बसतात मग अशा शौचालयाचा काय उपयोग? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहेत. दोन वर्षापासून शौचालयाचा काम अपूर्ण का? याचा बाकीचा निधी गेला कुठे? असे वेगवेगळे प्रश्न उद्भवत आहे. [ads id="ads2"]
यात दोष सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार ,की पंचायत समिती मधील इंजिनिअर कोणाचा समजावा, या सर्वांच्या डोक्यावर गटविकास अधिकारी यांचा तर हात नाही ना, म्हणून नवीन निंबोल गावातील शौचालयाची चौकशी त्वरित व्हावी अशी मागणी नवीन निंबोल गावातील संतप्त नागरिकांकडून होत आहे.


