यावल नगरपरिषद हद्दीत विकसित भागातील घाण पाणी यावल भुसावल रस्त्यावर वाहत असल्याने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या आजूबाजूला गटारीचे बांधकाम व्यवस्थित न केल्याने विकसित भागातील वापराचे घाण पाणी वाहून जात नसल्याने पर्यायी रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे व रस्ता नादुरुस्त होऊन यावल - भुसावळ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनधारकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असला तरी याकडे सा.बां.उपविभाग,यावल नगरपरिषद,आणि या रस्त्यावरून जा- ये करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे. [ads id="ads1"]
यावल नगरपरिषदेच्या जुन्या बंद पडलेल्या भुसावल नाक्याजवळ यावल भुसावळ रस्त्यावर वळणाच्या ठिकाणी वाहनधारकांना दिसून न येणारा मोठा खड्डा पडला आहे या ठिकाणी अपघात होऊन एखाद्या मोटर सायकल चालकाचा बळी पडू शकतो, चार चाकी वाहनाचा अपघात होऊन आर्थिक व शारीरिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,या ठिकाणापासून तसेच यापुढे विकसित भागातील घाण पाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गटारी अभावी भुसावळ रस्त्यावर रस्त्यावर वाहत असल्याने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. [ads id="ads2"]
यावल भुसावळ रस्त्यावर निमगाव या गावाजवळ पूलाचे बांधकाम सुरू झाले आहे या बांधकामाच्या ठिकाणी पर्यायी रस्ता व्यवस्थित न केल्याने त्या ठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे, पूलाच्या बांधकामाविषयी नियमानुसार माहिती फलक लावलेला नसल्याने तसेच सुरू असलेल्या बांधकामा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निरीक्षण अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नवीन पुलाचे बांधकामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी : भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती
यावल भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावापर्यंत जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत आहे,सार्वजनिक बांधकाम विभाग यावल भुसावळ रस्त्याची ठेकेदारा मार्फत दुरुस्ती करीत नसल्याने याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग वरिष्ठ अधिकारी,आमदार,खासदार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.