रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दिनांक 28/01/2023 या दिवशी शाळेत सदरील दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी सूर्य देवाच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर, व सर्व शिक्षक वर्ग यांचे शुभहस्ते झाले. [ads id="ads1"]
त्यानंतर सौ.ललिता राणे मॅडम यांनी आजच्या दिनाचे महत्त्व या विषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सामूहिक सूर्य नमस्कार, काढले.श्री नितीन पाठक सर यांनी प्रात्यक्षिक करवून घेतले..वेळोवेळी माहिती दिली. [ads id="ads2"]
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीम.उषा चव्हाण मॅडम यांनी केले.शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.