ऐनपूर (विनोद हरी कोळी) : ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात वित्तीय साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली. युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा रावेर येथील शाखा व्यवस्थापक श्री प्रदीप राठोड यांनी बँकेच्या विविध योजना तसेच, एटीएम कार्ड, आँनलाईन बॅन्किग, मोबाईल बॅन्किग,नेट बँकिंग बाबत माहिती दिली. [ads id="ads1"]
बॅन्क पुरवित असलेल्या सेवा,कर्ज योजना विमा इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सतिश वैष्णव यांनी केले.स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले. बॅन्केच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी समिती मार्फत करण्यात आले. आभार प्रा महेन्द्र सोनवणे यांनी मानले.



