रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)
रावेर तालुक्यातील नवीन निंबोल या गावात ( 15 व्या वित्त आयोगातून) स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत नवीन निंबोल या गावात पंधराव्या वित्त आयोगातून शासनाचा गावाच्या विकासासाठी लाखोचा निधी आलेला आहे. [ads id="ads1"]
त्यात बरेचसे कामे निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहेत त्यापैकी पुरुषांची मुतारी आधीच जागा सापडेना जागा सापडली तर जिथे कोणाचा वापर नाही अशा ठिकाणी म्हणजेच स्मशानभूमीच्या शेवटच्या कोपऱ्यावर गावातील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की ज्या ठिकाणी जिवंत माणूस मुतारी मध्ये जाऊ शकत नाही ,त्या ठिकाणी गोर मधले मुर्दे उठून जातील का ? असा सवाल संतप्त नागरिकांकडून होत आहेत. [ads id="ads2"]
तसेच पुरुषांची मुतारीचे बांधकाम करत असताना बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाची जिला रेती म्हटली जाणार नाही अशी माती खडी मिक्स रेती त्या बांधकामामध्ये वापरली जात आहेत शासनाच्या निधीचा गैरवापर होत आहेत त्यात पंचायत समिती मधील इंजिनिअर गटविकास अधिकारी यांचा हात ठेकेदाराच्या डोक्यावर असल्याचं दिसून येत आहेत.
हेही वाचा :- बोराच्या झाडाला गळफास घेत तरुणाने संपविली जीवन यात्रा आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातली घटना
तसेच शासनाच्या कामात दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहेत इंजिनीयर गटविकास अधिकारी आता तरी निंबोल मधील कामांवर लक्ष देतील का असे निंबुलगावातील नागरिकांकडून बोलले जात आहेत


