रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील कोचुर बु।। येथील ग्रामसेवक राहुल रमेश लोखंडे याच्या बाबत दोन वर्षापासून आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यानिशी पंचायत समिती कडे तक्रारी करूनही चौकशी केली जात नसल्याने तांदलवाडी येथील तक्रारदार निरंजन तायडे सदर प्रकरणी राज्याचे लोक आयुक्त यांचे दार ठोठावण्याच्या तयारीत असल्याचे समजते.[ads id="ads2"]
राहुल रमेश लोखंडे या ग्रामसेवकाच्या कामकाजाबाबत पंचायत समिती स्तरावर गभीर स्वरूपाच्या तक्रारी असून गेल्या वर्षी या ग्रामसेवकावर तालुका अंतर्गत बदली साठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतल्या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा देखील दाखल आहे.
हेही वाचा :- बोराच्या झाडाला गळफास घेत तरुणाने संपविली जीवन यात्रा आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातली घटना
सध्या लोखंडे जामिनावर बाहेर आहे, अश्या ग्रामसेवकास पंचायत समिती प्रशासन पाठीशी का घालत आहे, या बाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.तक्रारदार प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून लोक आयुक्त यांच्याकडे दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.


.jpg)