साकरे येथे विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


छत्रपती शिवराय ते भीमराय यांच्या विचारांचा वसा आम्हाला आज ही प्रेरणादायी ; ऍड रवींद्र गजरे

नामांतराच्या लढ्यात मराठा समाजाचे विलास ढाणे यांचे बलिदान कदापि ही विसरता येणार नाही ; व्याख्याते सतीश शिंदे

धरणगाव  (निलेश पवार) तालुक्यातील साकरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील घनश्याम पाटील व प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य भानुदास पाटील,प्रवीण बाविस्कर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.कार्यक्रमा प्रसंगी दोघंही व्याख्यात्यांचा रोहिदास सोनवणे, पोलीस पाटील घनश्याम पाटील यांनी.सतीश शिंदे,ऍड रवींद्र गजरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.नामांतराच्या लढ्यात मराठा समाजाचे विलास ढाणे यांचे बलिदान कदापि ही विसरता येणार नाही समतेची शिकवण अंगीकारा विषमतेचे मूळ आपोआप संपेल असे प्रतिपादन व्याख्याते सतीश शिंदे यांनी केले. [ads id="ads1"]  

  यावेळी कार्यक्रमाचे दुसरे व्याख्याते ऍड रवींद्र गजरे यांनी इतिहास संदर्भात अनेक दाखले उदाहरण देताना छत्रपती शिवराय ते भीमराय यांच्या विचारांचा वसा आम्हाला आज ही प्रेरणादायी असून महापुरुषांचे विचार समानता प्रदान करणारे आहेत असे प्रतिपादन ऍड रवींद्र गजरे यांनी केले. [ads id="ads2"]  

  कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील घनश्याम पाटील,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बाविस्कर,भानुदास पाटील,रोहिदास सोनवणे,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष सिराज कुरेशी,निलेश पवार,गौतम गजरे,गुलाब सोनावणे,श्रावण पानपाटील, उपस्थित होते.कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार धनराज सोनवणे यांनी केले.यावेळी प्रबोधन व्याख्यानाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!