जाडगाव ते फुलगाव या गावाच्या रस्त्यालगत जवळजवळ 100 ते 150 वीटभट्टे आहेत. या सर्व वीट भट्टी जळगाव शिवारात येत असून या सर्व वीटभट्ट्या काही वर्षापासून आपले ठाण मांडून आहेत. या वीटभट्त्यामुळे वारंवार विपरीत परिणाम होत आहेत हे सर्वांना दिसते ,परंतु काही लोकांच्या वरदहस्तांमुळे या भट्ट्यांकडे नेहमी प्रशासनांकडून दुर्लक्ष केले जात आहे. [ads id="ads2"]
आजूबाजूच्या शेती व शेतकरी सुद्धा याच्या राखेमुळे बेजार होतांना परिणाम होत आहे वीटभट्यामुळे दूषित वातावरण, पर्यावरण तसेच लोकांचे आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. लोकांना विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या कारणावरून वीटभट्टी बंद करण्यात यावे जाडगाव येथील ग्रामस्थांनी मा. तलाठी व मा. सर्कल यांना वेळोवेळी तोंडी विनंती करून सुद्धा काहीच परिणाम झाला नाही. परंतु मा.तलाठी व सर्कल यांनी परिपूर्ण दुर्लक्ष केले आहे.
या वीट भट्टींमुळे त्रास जवळजवळ जाडगाव, फुलगाव ,मन्यारखेडा आणि साखरी या गावांवर जास्त प्रमाणावर होत आहे, तसेच या वीट भट्टी साठी लागणारे राख व माती व विटेचे तुकडे हे ट्रॅक्टर द्वारे वाहतूक केली जाते. वाहतूक करताना रस्त्यावर राख आणि माती सांडली जाते व राख मातीचे रूपांतरण चिखलात होते आणि ग्रामस्थांच्या छोट्या-मोठ्या अपघात होतात अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते आहे.सर्वसामान्य लोकांना या गोष्टीचा मानसिक आणि आर्थिक त्रास होतो. म्हणून भुसावळ तहसीलदार यांना संविधान आर्मी मार्फत हे वीट भट्टी त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे. कार्यवाही न झाल्यास संविधान आर्मी मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे


