रावेर तालुक्यातील धामोडी येथे घाणीचे साम्राज्य... मात्र ग्रामपंचायत ला मुहूर्त सापडेल का ?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

धामोडी येथील राजे संभाजी नगर मध्ये सांडपाणी मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत ला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. जे सांडपाणी आहे ते रस्त्यावर उतरले असून. त्यामुळे रस्त्यावरून चालताही येत नाही यामुळे स्थानिकांना त्रास होतो.  [ads id="ads1"]  

 पण याकडे ग्रामपंचायत अद्याप लक्ष देत नाही. तसेच रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. गटारीतील घाण व्यवस्थित काढली जात नाही. आणि जे काढलेली घाण आहे ते रस्त्यावरच टाकली जाते तिची विल्हेवाट लावली जात नाही. जुन्या गटारींमधील गाळ काढण्याऐवजी त्यावरच नवीन गटार बांधण्यात आली बांधलेल्या गटाराचे पाणी व्यवस्थित मार्गी लागले नाही. धामोडी राजे संभाजीनगर येथील गटारी, रस्ते वेगवेगळ्या निधीतून बऱ्याच वेळा झाले पण परिस्थिती काही बदलत नाही. त्यामुळे विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपये वाया जात असून, 'आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय' अशी अवस्था झाल्याचे चित्र आहे. [ads id="ads2"]  

   जनतेला घाणीचा भरपूर त्रास होतो डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम होतांना दिसत आहे. तुंबलेल्या गटारी चिखलमय रस्ते घाणीचे साम्राज्य अशी भयानक अवस्था धामोडी राजे संभाजीनगर येथील आहे. त्यामुळे नारीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे आणि आमचे मतदान मागायला येऊ नका मतदान यादीतून आमची नावे वगळून टाका अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी यांच्याकडुन येत आहे. तुंबलेल्या गटारी मुळे खराब पाणी नळामध्ये जाते. गटारींची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर तुंबून राहते त्यामुळे मोटरसायकल व्यवस्थित चालत नाही. गटारी रस्ता यासारख्या मूलभूत नागरी सुविधा व्यवस्थित उपलब्ध नसल्यामुळे गल्लीतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आपापसात भांडण होत असतात तरीही ग्रामपंचायत फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे हे दिसून येते. सांडपाणी साचून अस्वच्छता दुर्गंधी पसरत असून डेंगू मलेरिया सारखे आजार होण्याचा संभव निर्माण होतो. आणि पावसाळ्यात पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावरच साचते. वार्डकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसुन येत आहे. याबाबत ग्रामपंचायत उघड्या डोळ्यांनी पाहूनही कारवाई करीत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत ग्रामपंचायतकडे वारंवार सुचना देऊन पण दखल घेतली जात नाही. वार्ड प्रतिनिधी, कर्मचारी नेहमी या ठिकाणाहून ये जा करतात तरीही या विषयाकडे लक्ष असून सुद्धा न दिसल्यासारखे करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!