रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील विवरा खु ।। ग्रा प च्या ग्राम विकास अधिकाऱ्याने अठ्ठावीस लाखाची कामे करून कामावर एकही मजूर न लावल्याची तक्रार खिरवड येथील माहितीचा अधिकार कार्यकर्ते शेख नजमुद्दीन शेख मुनिर यांनी प स रावेर गट विकास अधिकारी यांचेकडे केली आहे. [ads id="ads1"]
मात्र दोन महिने उलटूनही प स प्रशासनाने तक्रारीस आवश्यक ते पुरावे दाखल करूनही चौकशीस सुरुवातच केल्याचे दिसून येत नसल्याने तक्रारदार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांचेकडे तात्काळ चौकशी होऊन विवरा खु।। येथील ग्राम विकास अधिकारी तथा ग्रामसेवक तालुका संघटनेचे सचिव अतुल पाटील यांचे विरुद्ध प्रशासकीय कारवाईसाठी पत्रव्यवहार केला आहे. [ads id="ads2"]
तक्रारदार यांचेशी संपर्क केला असता, येत्या २५ जानेवारी पर्यंत अतुल पाटील यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई न झाल्यास २६ जानेवारीपासून प स रावेर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करेल, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा :- बोराच्या झाडाला गळफास घेत तरुणाने संपविली जीवन यात्रा आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातली घटना



