रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी तालुकास्तरीय बैठक उद्या दिनांक 18,1,2023 बुधवार रोजी दु.11 वाजता नवीन विश्रामगृह रेस्ट हाऊस सावदा रोड रावेर येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षेखाली विविध विषयांवर संपन्न होणार असून विषय पुढीलप्रमाणे [ads id="ads1"]
1 पदवीधर मतदार संघ निवडणूक संदर्भात 2 जिल्हा परिषद 7 गट व पंचायत समिती 14 गणाचे निरीक्षकांचे अहवाल सादर करणे बाबत 3 तालुक्याचा आढावा घेऊन मेळावे घेणे बाबत या विषयी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. विनोद भाऊ सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश भाऊ इखारे ,जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग, जिल्हा संघटक शेख याकूब शेख नसीर हे बैठकीला मार्गदर्शन करणार आहे. [ads id="ads2"]
तरी वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण पदाधिकारी व शहर कार्यकारणी महिला आघाडी व पदाधिकारी तसेच शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे बहुजन समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम आंबेडकरी चळवळ येथील कार्यकर्त्यांनी व मुस्लिम ,तडवी, ओबीसी समाजाने या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन रावेर तालुका महासचिव कांतीलाल गाढे, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे ,सलीम शहा यासीन शहा, कंदरसिंग बारेला, विनोद तायडे, अर्जुन वाघ, ज्ञानेश्वर ,तायडे सचिन तायडे, राहुल गाढे ,उमेश सवरने, राजेंद्र अवसरमल, नितीन अवसरमल, भास्कर वाघ ,संजय मशाने ,शेख इमरान, दौलत अढांगळे,महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ गायत्री कोचुरे ,महासचिव आशमा पिंजारी, माधुरी भालेराव, वसंत बाई तडवी, संगीताबाई ठाकूर ,संत्राबाईला बारेला, पुनम कोचुरे ,दीपक वाघ, राहुल करवले, हर्षवर्धन सावंत, गौतम अटकाळे , तरुण सवरने इत्यादी व कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध दिले आहे.
हेही वाचा :- बोराच्या झाडाला गळफास घेत तरुणाने संपविली जीवन यात्रा आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातली घटना


