विवरे खुर्द येथील ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील यांच्यावर कारवाई साठी तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील विवरा खु।। येथे सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात १४ वा वित्त आयोगाचा निधीतून केलेल्या कामांवर ग्राम विकास अधिकारी तथा तालुका ग्रामसेवक युनियनचा सचिव अतुल पाटील याने एकही मजूर न लावल्याची किमया केल्याची बाब शेख नजमुद्दीन शेख मुनिर यांनी मागितलेल्या माहितीत उघड झाल्याने तक्रारदार यांनी प स रावेर प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे  [ads id="ads1"]  आणि अतुल पाटील यांच्या विरुद्ध प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे ; मात्र काल गट विकास अधिकारी यांनी घेतलेल्या सुनावणी वेळी अतुल पाटीलने बनवा बनवी केल्याची बाब उघड झाली आहे.पाच फेब्रुवारी पर्यंत संबधीत ग्राम विकास अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास तक्रारदार शेख नजमुद्दीन शेख मुनिर प स कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यावर ठाम असल्याचे दिसुन येत आहे.

हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!