विवरे ता रावेर(संजय मानकरे)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज, व शिवरत्न जीव रक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन युवक प्रदेशाध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे व युवक प्रदेश सचिव प्रा. डॉ.नरेंद्र महाले यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर जीवा सेना युवक प्रदेशाध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे , प्रदेश सचिव प्रा डॉ नरेंद्र महाले, जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ श्रीखंडे, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष सुरेश भाऊ ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आप्पा झुरके विभागीय अध्यक्ष उदय भाऊ सोनवणे, ई उपस्थित होते. [ads id="ads1"]
सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमात जिवा सेना रावेर तालुका युवक व महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्या मध्ये जिवा सेना रावेर तालुका महिला अध्यक्षपदी सौ ज्योतीताई रवींद्र सापकर,तर सौ कविताताई मनोहर चौधरी यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली मुक्ताईनगर तालुक्याच्या महिला अध्यक्षपदी सौ स्वातीताई चंद्रकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली. [ads id="ads2"]
रावेर तालुका युवक अध्यक्षपदी उमेश निंबाळकर, उपाध्यक्षपदी ललित रामकृष्ण शिवरामे, हितेश श्रीधर मानकरे,सचिव पदी अक्षय रवींद्र टोंगे, कार्याध्यक्ष पदी राजेश सावळे, सरचिटणीस पदी मयूर प्रकाश शिरनामे, तर सदस्य पदी गौरव सुधाकर श्रीखंडे, जितेंद्र छबीलदास शिरनामे, धीरज रोहिदास आटवाल, सरचिटणीस पदी संजय दत्तात्रय बानाईत, यांची निवड करण्यात आली या वेळी रावेर तालुक्याने गाव तेथे शाखा ही संकल्पनेची चांगलीच उभारी घेतली आहे तालुक्यात बऱ्यापैकी शाखा ओपनिंगचा धूम धडाका फार जोरात चालूआहे येत्या काळात सुशिक्षित बेरोजगार मेळावा, सलून दुकानदार बांधवांचा वधु वर परिचय मेळावा , व्यसनमुक्ती शिबिर,आरोग्य शिबीर ,सामाजिक प्रमाणे राजकीय क्षेत्रात समाजाने वाटचाल करावी ग्रा. प.सदस्य पं. स. सदस्य जि. प. सदस्य अश्या स्वरूपात राजकीय क्षेत्रात सुद्धा सुरुवात करणे गरजेचे आहे समाजाच्या संघटनाची गरज ही खर तर ग्रामीण भागातून आहे.
हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना
शहरी भागात एवढी समस्या नसते जितकी ग्रामीण भागात असते म्हणून समाजाचे संघटन हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले पाहिजे उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्ह्यामध्ये वरील प्रमाणे रावेर पॅटर्न योजना राबवली जाईल या योजनेमध्ये रावेर तालुक्यातून जिल्हा कार्याध्यक्ष गणेश भाऊ शेठि, तालुकाध्यक्ष जीवन भाऊ बोरणारे जिल्हा संघटक योगेश भाऊ आमोदकर,यांच्या सोबत सर्व कार्यकर्ते यांनी स्वतःला झोकून दिलेले आहे या या सर्वांनी रावेर पॅटर्न हा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राबवण्याचा मानस व्यक्त केला कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.