सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- यंदा राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग जि.प.जळगांव यांच्या संयुक्त विद्यामाने सन २०२२ - २०२३ या शैक्षणिक वर्षातील ५० वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा येथे करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन २४ आणि २५ जानेवारी या दोन दिवशी आयोजित केले आहे.कार्यक्रम यशस्वीते साठी नुकतीच आज दि २१ रोजी डायमंड इंग्लिश स्कूल सावदा येथे एजाज शेख उपशिक्षणाधिकारी जि.प. जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली.याप्रसंगी जे.के पाटील, सुनील वानखेडे,संदीप पाटील, एस.आर.महाजन,एस.एस. वैष्णव,शेख सर उर्दू हायस्कूल सावदा,एस.व्हि.अली सह परिसरातील शाळांचे शिक्षक उपस्थित होते. [ads id="ads1"]
तरी दि.२४ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ असून उद्घाटक म्हणून डॉ.पंकज आशिया मुख्याकार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांच्या शुभहस्ते होईल.तसेच कार्यक्रम अध्यक्ष म्हणून हाजी इकबाल हुसैन फाऊंडेशन सावदाचे सचिव डॉ.शेख हारुन शेख इक्बाल हे राहतील.
सदर कार्यक्रमासाठी श्रीमती उषा राणी देवगुने तहसीलदार रावेर, श्रीमती दीपिका कोतवाल बी.डी. ओ.पं.स.रावेर,जे.के.पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ यांची प्रमुख उपस्थिती राहील. [ads id="ads2"]
तर यशस्वी स्पर्धकांचे पारितोषिक वितरण दि.२५ जानेवारी रोजी कैलाश कडलक (उपविभागीय अधिकारी फैजपूर यांच्या शुभहस्ते व डॉ.अनिल झोपे प्राचार्य डायड जळगांव यांच्या अध्यक्षेखाली केले जाईल.
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले
सदरील विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम डॉ.नितीन बच्छाव माध्य. शिक्षणाधिकारी,विकास पाटील प्राथ.शिक्षणाधिकारी,एजाज शेख उपशिक्षणाधिकारी,श्रीमती रागिणी चव्हाण उपशिक्षणाधिकारी जळगांव सह शैलेश दखणे गटविकास अधिकारी रावेर यांच्या मार्गदर्शनखाली होत असून यात मुख्याध्यापक संघटना सहीत परिसरातील सर्व शिक्षक व जिल्हा विज्ञान मंडळ परिश्रम घेत आहे.तरी परिसरातील सर्व विज्ञान प्रेमी यांनी याचे लाभ घ्यावे.असे आवाहन दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रा.योगेश कोष्टी यांनी केले आहे.