रावेर तालुक्यातील विवरे खुर्द चे ग्राम विकास अधिकारी यांच्या चौकशीचे अखेर जिल्हा परिषदेचे आदेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील विवरे खुर्द चे ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याच्या चौकशीचे अखेर जिल्हा परिषदेचे आदेश

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील उटखेडा येथील तत्कालीन ग्रामसेवक व हल्ली ग्रा प विवरा खु।। येथील ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या कामकाजाबाबत जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रा. प) श्री. अनिकेत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. [ads id="ads1"]  

ग्राम विकास अधिकारी तथा तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव अतुल पाटील यांनी १४ वा वित्त आयोगाचा सन २०२१-२०२२ चा निधी खर्च करताना कामे मजूरच न लावताच करून दाखविल्याचा विक्रम केल्याची बाब तक्रारदार शेख नजमुद्दीन शेख मुनिर यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या माहितीत उघड झाल्याने तक्रारदार यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली होती. [ads id="ads2"]  

   त्यास अनुसरून अतुल पाटील याच्या कामकाजाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गट विकास अधिकारी, प स रावेर यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा:- आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुतीची जबाबदारी व नवजात बाळाला व मातेला रुग्णवाहिका सेवा न देणाऱ्या डॉ. विजया झोपे यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा - बहुजन समाज पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य प्रदीप सपकाळे यांची निवेदनाद्वारे मागणी

हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले

पंचायत समिती प्रशासन आता याबाबत जिल्हा परिषदेला नेमका काय अहवाल पाठवते? हे येत्या काही दिवसात कळेल.तक्रारदार मात्र सहा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते.



#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!