रावेर ग्रामीण प्रतिनीधी( दिनेश सैमिरे ) वंचित बहुजन आघाडीची सावदा येथे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात बैठक संपन्न झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी प्रास्ताविक मध्ये वंचित बहुजन आघाडीची रुपरेषा तसेच वंचितांना न्याय देण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचितांना न्याय देण्याचे काम करीत आहे .गोरगरीब जनतेचे कामे शासन दरबारी कसे मार्गी लावून शासनाच्या विविध योजनांचे माहिती दिली. [ads id="ads1"]
तसेच वंचित बहुजन आघाडीचे कामगार युनियनचे महासचिव बालाजी भाऊ पठाडे यांनी मजूर वर्गांना व बांधकाम करणारे मिस्तरी कामगार यांना युनियनच्या माध्यमातून कसे फायदे घेता येतील या संदर्भात माहिती दिली. तसे प्रत्येक कामगाराने आपले रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे यासाठी लागणारी संपूर्ण माहिती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिली जाईल. व त्या मजुरी करणाऱ्या कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. [ads id="ads2"]
अध्यक्ष भाषणात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष हे म्हणाले की आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित समाजांना न्याय देण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्र मध्ये लहान समाजापासून तर मोठ्या समाजापर्यंत वंचितांना सत्तेमध्ये बसवण्याचे काम श्रद्धे हे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे करीत आहे. आपल्या जवळच्या अकोल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका व ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण बहुजन समाजाचे लोक सत्तेमध्ये बसवण्याचे काम या महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाच्या नेत्याने केले नाही ते बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी करून दाखवले आहे. असे अध्यक्ष म्हणाले.
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले
हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
या बैठकीला जिल्ह्याचे उपाध्यक्ष रफिक बॅग ,तालुका उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा,रावेर शहर उपाध्यक्ष दौलत अढांगळे, अब्दुल खलिद, शेख कलीम शेख हनीफ, शेख अमीन शेख इकारा उद्दीन, शेख अजमल शेख शफी, खालील रवल युनूस सय्यद या बैठकीला बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.