रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)
माजी राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनिल भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक 18 /01/2023 बुधवार रोजी रावेर येथील तहसीलदार मयूर कळशे यांना दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुकाध्यक्ष विनोद कोळी तसेच प्रहार दिव्यांग सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. [ads id="ads1"]
रावेर तालुक्यातील सर्व संजय गांधी योजना लाभार्थी इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना लाभार्थी तसेच श्रावण बाळ योजना लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांना वेळेवर दर महिन्याला वेळेवर शासनाने देण्यात यावे. [ads id="ads2"]
1) तसेच ST, SG आणि जनरल या सर्वांचे अनुदान दर महिन्याला वेळेवर शासनाने देण्यात यावे.
2) वरील सर्व लाभार्थ्यांना रेशन कार्डावरील एकत्रित कुटुंबात नाव असल्यास त्यांचे पगार चालू करण्यासाठी त्यांना पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे.
3) तसेच वरील दिव्यांग लाभार्थी यांनी पगारासाठी फार्म भरल्यावर त्यांना अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र असल्यावर किंवा अपात्र असल्यावर सुद्धा त्यांची माहिती रावेर तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचायत तलाठी कार्यालय या ठिकाणी माहिती पाठविण्यात यावी आणि त्यांना कार्यालयाबाहेर या सर्वांची यादी लावण्याचा आदेश शास.नाने त्वरित देण्यात यावा.
4) रावेर तालुक्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना त्यांच्या गरजेनुसार रोजच्या आहारात गहू या धान्याचा समावेश असतो आणि तांदुळाचा समावेश कमी असतो त्यामुळे रेशन धारकांना प्रतिव्यक्ती चार किलो तांदूळ ऐवजी चार किलो गहू आणि एक किलो तांदूळ शासनाने द्यावा.
अशा प्रकारच्या वरील प्रमाणे सर्व मागण्या दहा दिवसाच्या आत शासनाने त्वरित मंजूर कराव्यात अन्यथा रावेर तालुक्यातील सर्व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी तसेच कार्यकारणी संघटना तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उपोषण तहसील कार्यालयासमोर करण्यात येईल.
त्याप्रसंगी उपस्थित प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष, विनोद कोळी .प्रहार जनशक्ती पार्टी युवा तालुका अध्यक्ष, योगेश निकम. दिव्यांग तालुका उपाध्यक्ष, शशिकांत पाटील .दिव्यांका तालुका उपाध्यक्ष ,जितेंद्र कोळी. तालुका कार्याध्यक्ष, दिनेश सैमिरे .तालुका सल्लागार, विश्वनाथ भिल्ल. प्रहार जनशक्तीचे उपाध्यक्ष, फिरोज तडवी .सुलवाडी शाखाप्रमुख, गोपाल कोळी. प्रहार जनशक्ती पार्टीचे सह संपर्कप्रमुख सुधीर पाटील. इत्यादी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


