जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस 'स्थापना दिवस (रेझिंग डे)' निमित्त जळगावकरांसाठी पोलीस बँड पथकाचे संगीतमय सादरीकरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस 'स्थापना दिवस (रेझिंग डे)' निमित्त जळगावकरांसाठी पोलीस बँड पथकाचे संगीतमय सादरीकरण


जळगाव( सुवर्ण दिप वृत्तसेवा) तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला २ जानेवारी १९६१ साली ध्वज प्रदान केला, तोच दिवस महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने आज दि. 2 जानेवारी २०२३ जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस 'स्थापना दिवस (रेझिंग डे)' साजरा होत असून जळगावकरांसाठी महात्मा गांधी उद्यान जळगाव येथे पोलीस बँड पथकाचे संगीतमय सादरीकरण करून रेझिंग डे सप्ताहाचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक, श्री एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस बँड पथकाचे संगीताला भरभरून दाद दिली.  [ads id="ads1"]  

यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक श्री संदीप गावित, पोलीस निरीक्षक श्री किसन नजन पाटील, श्री ठाकूरवाड, श्री दिलीप भागवत, श्री कुंभार, श्री जयपाल हिरे, राखीव पोलीस निरीक्षक श्री सोनावणे शांती दूत सेनेचे अधिकारी अमलदार, प्रतिष्ठित नागरीक, तसेच इतर अधिकारी अमलदार हे उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!