रावेर (विनोद हरी कोळी) ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर दि. १७/०१/२०२३ ते २३/०१/२०२३ या कालवधीत दत्तक वस्ती बलवाडी ता. रावेर येथे पार पडले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे या निवासी शिबिरात वैचारिक प्रबोधन व श्रमसंस्कार करण्यात आले. [ads id="ads1"]
जि. प. शाळा बलवाडी परिसरात, गावात, हायस्कूल परिसर,स्मशानभूमीत साफ सफाई करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांनी शौचालय व नळ कनेक्शन चा सर्व्हे केला. गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली त्यावेळी कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर पथनाट्य सादर केले. [ads id="ads2"]
समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. रामदास महाजन यांनी भुषविले. बलवाडी गावाच्या सरपंच मा. सौ वैशाली महाजन यांच्या शुभहस्ते समारोप करण्यात आला. यावेळी श्री. बा. ना. पाटील माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन श्री. विनोद जगन्नाथ पाटील, ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भागवत पाटील, संचालक श्री. कैलाश पाटील, श्री. एन. व्ही. पाटील, श्री. प्रल्हाद मधुकर पाटील, श्री. पी आर चौधरी, श्री आर एस पाटील, श्री दिलिप पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, ग्रामसेवक श्री. प्रकाश तायडे, ग्रामपंचायत सदस्य श्री जितेंद्र महाजन , जि. प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर पाटील, श्री. ज्ञानेश्वर पाटील, श्री. अरविंद पाटील, श्री. गोविंदा महाजन, किशोर पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिपक पाटील यांनी शिबीराचा अहवाल सादर केला. समारोपा प्रसंगी निशा अवसरमल, गणेश पाटील, दुर्गेश अडांगळे,उमेश, प्रफुल्ल पवार , अल्ताफ पटेल या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून कॅम्प संपल्यामुळे वेगळे होण्याची खंत व्यक्त करत विविध वक्त्यांचे मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी हे शिबीर म्हणजे संस्कारांची शाळा आहे. शिबिरात मिळालेले अनुभव व संस्कार आयुष्यभर कामात येतील असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात मा. रामदास महाजन यांनी रासेयो स्वयंसेवकांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलाचे कौतुक केले. सुत्रसंचलन रासेयो स्वयंसेवक मेहल पाटील हिने तर आभार गुरव हिने मानले. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय पाटील,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा पाटील, श्री. गोपाळ महाजन, रासेयो स्वयंसेवक, नितीन महाजन यांनी परिश्रम घेतले.


