रावेर ग्रामीण प्रतिनीधी (दिनेश सैमिरे)
कोरोनापासुन बंद असलेल्या बैठकांना विवरे पासुन पुन्हा सुरवात संघटनेतील पत्रकारामध्ये नवसंजीवनी...
पत्रकारांना ब्लुतुथ एअरफोन सह स्पिकर माईक देण्याचे संकल्प,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रावेर तालुका संघटनेची मीटिंग संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास ताठे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवार रोजी सकाळी १० वाजता विवरे ता.रावेर येथे सप्तश्रृंगी माता मंदीर येथे आयोजित करण्यात आली होती. [ads id="ads1"]
या बैठकीत सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रावेर तालुक्यातील पत्रकार सदस्य यावेळी हजर होते. या बैठकीत पत्रकारांना मोफत ब्लुयटुथ हेडफोन सह मोबाईल माईक देण्याचे ठरविण्यात आले आहे. [ads id="ads2"]
तसेच संघटना बळकट करण्यासह विविध विषयावर तपशिलवार चर्चा करण्यात आली.बैठकीचा अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष विलास ताठे, हे होते.यावेळी उपाध्यक्ष संतोष नवले.कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सल्लागार सद्दाम पिंजारी, कैलास लवंगडे, सुरेश पवार,जगदीश चौधरी, प्रदीप महाराज,अनिल मानकरे, महेंद्र पाटील, मगन पवार,आदी पत्रकार उपस्थित होते.


