जागृत मतदार बलकट लोकशाहीचे प्रतिक: डॉ जे बी‌ अंजने याचे प्रतिपादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर (विनोद हरी कोळी) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ जे बी अंजने होते. या कार्यक्रमात प्रथम प्रा व्ही. एच पाटील यांनी सर्वांना शपथ दिली मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्याने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा इ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात निबंध स्पर्धात प्रथम क्रमांक शितल रजाने, द्वितीय क्रमांक नेहा महाजन तर तॄतीय क्रमांक आर्या पाटील यांना मिळाला तसेच घोषवाक्य स्पर्धात प्रथम क्रमांक नेहा महाजन, द्वितीय क्रमांक विभुषा पाटील तर तॄतीय क्रमांक मेहल पाटील यांना मिळाला.[ads id="ads1"]  

   तसेच चित्रकला स्पर्धात प्रथम क्रमांक प्रज्ञा जाधव व द्वितीय क्रमांक नेहा महाजन यांना मिळाला आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ जे बी‌ अंजने यांनी बलकट लोकशाहीसाठी जागॄत मतदार असणे आवश्यक असते तसेच मतदार दिनाचे महत्त्व पटवून सांगितले.[ads id="ads2"]  

  सदर स्पर्धसाठी डॉ के जी कोल्हे, डॉ एस.ए. पाटील व डॉ. जे. पी. नेहेते, प्रा व्ही एच पाटील यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले तसेच डॉ एस. एन. वैष्णव व हेमंत बाविस्कर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अलताब पटेल यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!