धरणगाव (सुधाकर मोरे सर) साळवे हायस्कूल ता धरणगाव ची विद्यार्थ्यांनी रेणूका महाजनने आंतरशालेय विभागीय कुस्तीस्पर्धेत नाशिक येथील भगूरच्या तालमीत प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करून चौदा गुणांनी दणदणीत विजय मिळवला व सुवर्णपदकासह विशेष प्राविण्य प्रमाणपत्र मिळवल्याबद्दल साळवे ग्रामपंचायत तर्फे प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२३ ला सन्मानिय सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमार्फत सुवर्णपदक विजेती विद्यार्थ्यांनी रेणूका महाजन चा नागरीसत्कार करण्यात येणार आहे. [ads id="ads1"]
पंचक्रोशीतील नारीकांनी सकाळी नऊ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच सौ ईशाताई बोरोले व उपसरपंच सतिष पवार यांनी केले आहे.