रावेर तहसिल कार्यालयासमोर केळी पीक विम्याच्या रक्कमेपासून वंचित असलेल्या शेतकरी बांधवांचे लाक्षणिक उपोषण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर  ग्रामीण प्रतिनिधी (दिनेश सैमिरे)आज रावेर येथील तहसील कार्यलयासमोर केळीपीक विम्याची रकमेपासून वंचित असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची विम्याची रक्कम मिळावी म्हणून राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. [ads id="ads1"]  

  त्या अनुषंगाने आजराष्ट्रवादी ओबीसी सेल रावेर तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांच्यासह लाक्षणिक उपोषणाला तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.यावेळी उपोषणस्थळी माजी आमदार अरुणदादा पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,रावेरचे माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गनवाणी,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख मेहमूद,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील,पं स सदस्य योगेश पाटील,रवींद्र पाटील(गंपा दादा),सीताराम पाटील,पांडू पाटील,निलेश पाटील,महेंद्र पाटील, ओम इंगळे,काजी साहेब,निंभोरा ग्रा पं सदस्य शेख दिलशाद सर,दिलीप सोनवणे,यांसह गोपाळ ब-हाटे,धीरज भंगाळे, गोपाळ भिरुड,अशोक ब-हाटे, रामदास पाटील,धनराज महाजन,राकेश ब-हाटे,ज्ञानेश्वर पाटील,रामकृष्ण सरोदे,वामन खाचणे, धोंडू महाजन,महेश लोखंडे,उमेश चौधरी,बाळू महाजन,तुळशीराम महाजन,देविदास भंगाळे, आत्माराम पाटील, निळकंठ बढे,अनिता बढे,वासुदेव टोके, जगदीश बढे,जयंत भंगाळे, एकनाथ बढे,अजय पाटील,नाना पाटील,प्रकाश बढे,वैभव चौधरी,प्रदीप सपकाळे, नंदलाल राठोड,प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. [ads id="ads2"]  

  यावेळी सुरेश धनके यांनी भेट देत खा रक्षाताई खडसे यांच्याशी तर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील यांनी मोबाईलद्वारे आदरणीय आमदार श्री शिरिषदादा चौधरी यांच्याशी चर्चा करून देत दोघांनी अडचणी जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत बोलण्याचे आश्वस्त केले.तहसीलदार उषाराणी देवगुणे व तालुका कृषी अधिकारी मयुर भामरे यांनी शेतकऱ्यांची बाजू जाणून घेत याबाबत सर्व अहवाल मा जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून आपण सर्वांनी जळगाव जिल्हा कार्यालयात याच संदर्भात लावलेल्या बैठकीस उपस्थित रहावे तसेच श्री भामरे यांनी यापुढे विमा कंपनीच्या कामकाजाबत दक्ष राहून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असे आवाहन करीत उपोषण मागे घेण्याबाबत आवाहन केले.याला सर्वांनी समाधान व्यक्त केल्याने उपोषण मागे घेण्यात आले.व जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला रवाना झाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!