यावल (फिरोज तडवी ) फिरोज तडवी यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारामुळे गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन या अभीयांनाचा बोज बारा उडाला असुन ,ठेकेदारा व स्थानिक ग्रामपंचायतच्या मार्फत बोगस ठराव करीत शासनाच्या निधी लुट करण्याचा सपाटा सुरू अयुन या संदर्भात लेखी निवेदननिळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावल गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांच्याकडे दिली असून त्याची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. [ads id="ads1"]
सदरील प्रकरण यावल न्यायालया मध्ये चौकशी करीता दाखल करणार असुन या स्वार्थी व भोंगळ कारभाराची सखोल चौकशी व्हावी या करीता ३०जानेवारी ,२०२३ जानेवारी पासून यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्या चा इशारा, अशोक तायडे यांनी, पत्रकाद्वारे दिला आहे. [ads id="ads2"]
यावल तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणारी डोंगर कठोरा ,पाडळसा, सावखेडा सिम, थोरगव्हाण, वड्री, निमगाव ,गिरडगाव, कासारखेडा, चिंचोली, आडगाव, म्हैसवाडी यासह अनेक गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन या गावाच्या आजूबाजू ८ ते १o शौचालय ते प्रत्यक्ष गावांमध्ये वैयक्तिक ठेकेदाराकडून १२oooरुपये प्रमाणे एका गावामध्ये ४०० ते ५०० लाभार्थी यांना देण्यात आली आहे. शासकीय माहीतीवरून ही गाव मात्र हगणदारी मुक्त झाले आहे असून दिसून येत या गावांना सरकारकडून पुरस्कार जाहीर झाले तरीपण शौचालय बांधकाम करणारे ठेकेदार ग्रामपंचायत मधून काही बोगस ठराव घेऊन ते कामे मंजूर करण्यासाठी खोटे ठराव देत असा ग्रामसभेत कुठलीही चर्चा न करता हे ठराव मंजूर करीत आहेत पंधराव्या वित्त आयोगातून काही जण गावाच्या विकासाची व हिताची कामे रोखून ३०% रकमेची कोणतेही नियोजन न घेता सरपंच ग्रामसेवक ही सरकारची दिशाभूल करीत आहेत स्वतःच्या कमिशन साठी असे दोघी लोक कोणतेही ठराव न घेता स्वतःची तिजोरी भरण्यासाठी सरकारची दिशाभूल करीत आहेत जिल्हा पातळीवरून ही बोगस कामे बंद करण्याचे आदेश तालुका स्तरावरील संबधीत अधिकाऱ्यांना काढण्यात यावे जेणेकरून कामकाज झालेले कामाचे बिल रोखण्यात यावे ते सर्व झालेले कामे आहे ते त्वरित रोखण्यात यावेत, जेणेकरून शासनाच्या निधीचा गैर वापर होणार नाही याची काळजी पंचायत समिती यावल प्रशासनाने घ्यावी व संबंधीतांवर तात्काळ कारवाई करावी कारवाई न झाल्यास आपण सत्र न्यायालय या संदर्भात अर्ज दाखल करण्यात येईल व येत्या ३० जानेवारी २०२३ पासुन यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निळे निशाण सामाजिक संघटना यांचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी दिला आहे,
तरी संबंधीत अधिकारि खरोखरच या कामांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करणारा का या कडे वंचीत लाभार्थ्यांचे लक्ष वेधून आहे.