यावल (सुरेश पाटील)
आज दि.२८ रोजी यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मधे हळदी कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, या कार्यक्रमात अनेक महिला उपस्थित होत्या. [ads id="ads1"]
कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून शाळेचे चेअरमन राजेंद्र महाजन सर यांच्या मिसेस सौ. निर्मला महाजन मॅडम तसेच उंटखेडा येथील सौ.दिपाली पाटील मॅडम,सौ.कुंदा पाटील मॅडम व सौ.स्मिता पाटील मॅडम यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले.सर्वात प्रथम सौ.निर्मला महाजन मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. [ads id="ads2"]
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते प्रमुख अध्यक्ष पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हळदी कुंकू या कार्यक्रमात महिला पालक वर्गांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तसेच या कार्यक्रमात संगीत खुर्चीचे देखील आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.टिना निंबाळे मॅडम व सौ.कुंदा नारखेडे मॅडम यांनी केले,सौ.शीला तायडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेतील सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवर्ग यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.