यावल तालुक्यातील हिंगोणा येथे हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा तयार करण्याचा पहीला प्रकल्प ;एका वर्षात ३ हजार कोटींची उलाढाल होणार...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

एमसीएल संलग्न ग्रीन प्लॅनेट क्लीनफ्युएल प्रा.ली.अंतर्गत यावल किसान प्रोड्युसर कंपनी तर्फे यावल तालुक्यात हिंगोणे येथे पहिला नैसर्गिक कोळसा प्रकल्प उभारण्यात आला.या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तीन हजार कोटींची उलाढाल होणार आहे या प्रकल्पा द्वारे तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न आणि आर्थिक विकास होईल तसेच रोजगार निर्मिती होऊन देश प्रदूषण मुक्त होणार यातून खूप मोठी अर्थिक क्रांती देशात घडून येईल कंपनी सामाजिक दायित्व म्हणून उत्पन्नातील २०% हिस्सा समाजासाठी देणार असे कंपनीचे सल्लागार दिपक गोकुळ पाटील यांनी ही माहीती दिली. [ads id="ads1"]  

   ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या प्रकल्पाचे उदघाटन तालुका कृषी अधिकारी सागर शिणारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलतांना शिणारे म्हणाले की अश्या प्रकल्पांची तालुक्याला व देशाला खूप आवश्यकता आहे आज पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर एमसीएल प्रकल्प त्यासाठी वरदान ठरेल यावेळी कंपनीच्या अध्यक्षा सौ.ज्योत्स्ना दिपक पाटील सेवानिवृत्त कृषी अधिकारी ए.टी चौधरी,व्ही.ई. पाटील,एम.सी.गाजरे,एच.टी.पाटील राहुरी कृषी विद्यापीठाचे सीनियर बिडीए गजेंन्द्र सोनवणे बिडीए शिवाजी पाटील,डायरेक्टर गोकुळ पाटील,नामदेव पाटील,शुभम पाटील जळगांव जिल्ह्यातील तालुका उद्योजक ४४ ग्राम उद्योजक,फिल्ड ऑफिसर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. [ads id="ads2"]  

       सध्या देशाला लागणाऱ्या इंधनासाठी आपण ८ लाख करोड रुपये आखाती देशांना देतो कोळशाच्या वाढत्या मागणीमुळे सुद्धा आपला खूप पैसे बाहेरील देशांना जातो आणि यातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होऊन आपल्याला ग्लोबल वार्मिंग,प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती व बेरोजगारी अश्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे या सर्व समस्या सोडविण्यासाठी एमसीएल कंपनी जैविक कोळसा आणि एमसीएनजी जैविक खते व पर्यावरण पूरक प्रॉडक्ट तयार करणार आहे यातून तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, शेतकऱ्यांना शाश्वत कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल एक हजार रुपये टन भावाने हत्ती गवत खरेदी केले जाईल शेतकऱ्यांना एका एकरातून वर्षा काठी दीड ते दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळेल असेही यावेळी सांगण्यात आले या कार्येक्रमाचे सूत्रसंचालन किनगांव ग्राम उद्योजक आर.ई.पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर पाटील,अरुण चौधरी,दिपक खंबायत,योगेश चौधरी यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!