सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे विद्यार्थी विकास विभाग मार्फत महात्मा गांधी यांच्या ७५ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन सभेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी महात्मा गांधीजी हे महान नेते होते. [ads id="ads1"]
त्यांनी अनेक चळवळी उभारल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले असे त्यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले. तसेच आजच्या या अभिवादन सभेचे प्रमुख वक्ते डॉ. डी. बी. पाटील यांनी महात्मा गांधीजी हे त्यावेळी विदेशात शिक्षण घेण्याकरिता गेलेत आणि तिथून आल्यानंतर भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून स्वातंत्र्याची बीजे रोवली आणि भारत स्वतंत्र करण्याकडे आटोकात प्रयत्न केले असे त्यांच्या मनोगतात सांगितले. [ads id="ads2"]
या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले या अभिवादन सभेला विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. व्ही. एन.रामटेके यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.